Viral Video: 'पप्पा, माझ्या मुलांची काळजी घ्या'; गंगेत उडी मारण्यापूर्वी उत्तर प्रदेशातील तरुणाचा हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल, पहा
'पप्पा, माझ्या मुलांची काळजी घ्या. मी गंगेत उडी मारत आहे. कृपया मला माफ करा, मला खरोखर त्रास झाला आहे,' असं ही व्यक्ती व्हिडिओमध्ये म्हणत आहे.
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये, एक व्यक्ती उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अनुपशहर भागात गंगा नदीत उडी मारण्यापूर्वी त्याच्या वडिलांना हृदय पिळवटून टाकणारा संदेश पाठवत आहे. खुर्जाच्या बौरोली येथील रिंकू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीने व्हिडीओमध्ये आपल्या वडिलांना संबोधित करताना आपल्या मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 'पप्पा, माझ्या मुलांची काळजी घ्या. मी गंगेत उडी मारत आहे. कृपया मला माफ करा, मला खरोखर त्रास झाला आहे,' असं ही व्यक्ती व्हिडिओमध्ये म्हणत आहे. अनुपशहर पोलिसांनी स्टीमर आणि डायव्हर्सच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू केली. दिवसभर शोध घेऊनही रिंकूचा पत्ता लागला नाही.
व्हिडिओ पहा -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)