E-Bike Battery Blast in Surat: घरात चार्जिंग करताना ईव्ही बॅटरीचा स्फोट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर फिरत असलेला व्हिडिओ गुजरात येथील सुरत मधील असल्याचे सांगितले जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती

E-Bike Battery Blast in Surat

E-Bike Battery Blast in Surat: ई-बाईकच्या बॅटरीच्या स्फोटाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर फिरत असलेला व्हिडिओ गुजरात येथील  सुरत मधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये  एका खोलीच्या एका कोपऱ्यातून धूर निघतो आणि पुढे धुराचे आगीत रुपांतर होते. घटनेचे रेकॉर्डिंग करणारी व्यक्ती ओरडताना आणि कुटुंबातील दुसऱ्या सदस्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना ऐकू येते. घरामध्ये चार्जिंग करताना ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही आग लागली असावी असा संशय आहे.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by i Love Surat 😍 (@iamsurattcity)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)