Dog Terror in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये कुत्र्यांची दहशत; रस्त्यावर चालणाऱ्या तरुणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

ज्यामध्ये 4 ते 5 कुत्रे रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीवर हल्ला करत आहेत.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Image Credit: X

Dog Terror in Chhatrapati Sambhajinagar: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर येथे भटक्या कुत्र्याने एक तरुणीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये 4 ते 5 कुत्रे रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीवर हल्ला करताना दिसत आहेत.  मुलगी घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करते, मात्र कुत्रे तिच्यावर हल्ला करत राहतात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माहितीनुसार शहरात याआधीही कुत्रे चावल्याच्या, कुत्र्यांनी वाहनांचा पाठलाग केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Car Accident Viral Video:'रिल्सच्या नादात नव्हे तर ठरवून केलेला मर्डर'; गाडी रिव्हर्स करताना दरीत कोसळून अपघात झालेल्या प्रकरणात कुटुंबाचा दावा!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)