Char Dham Yatra: चारधाम यात्रेदरम्यान तरुणांनी गाडीच्या छतावर बसून केले मद्यपान; पोलिसांनी शिकवला धडा, जाहीर माफी मागायला लावली (Watch Video)
उत्तराखंड पोलिसांनी चारधाम यात्रेदरम्यान अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत कडक भूमिका घेतली आहे. काही तरुण धार्मिक स्थळांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करत असून, त्यांच्यावर सातत्याने कारवाई केली जात आहे.
Youngsters Spotted Drinking Alcohol On Char Dham Yatra: चारधामची यात्रा सुरू झाली आहे. 10 मे रोजी केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे उघडण्यात आले. पुढे 12 मे रोजी बद्रीनाथचेही दरवाजे उघडले गेले, त्यानंतर चारधनाचा प्रवास आता जोरात सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत देशभरातून प्रचंड जनसमुदाय उत्तराखंडला पोहोचत आहे. आता चार धाम यात्रेकरूंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये यात्रेला आलेले गाझियाबादचे काही तरुण थार गाडीच्या छतावर बसून दारू पीत असलेले दिसत आहेत. मात्र उत्तराखंड पोलिसांनी त्यांना पकडले. आधी त्यांची दारू हिसकावून घेतली आणि नंतर कॅमेऱ्यात त्यांना माफी मागायला लावली. हा व्हिडिओ रुद्रप्रयागमधील सोनप्रयागमधील पार्किंगचा असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तराखंड पोलिसांनी चारधाम यात्रेदरम्यान अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत कडक भूमिका घेतली आहे. काही तरुण धार्मिक स्थळांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करत असून, त्यांच्यावर सातत्याने कारवाई केली जात आहे. (हेही वाचा: Kolhapur Horse Carriage Race Accident: टांगा उलटल्याने अपघात; घोडागाडी शर्यत अंगाशी, दुचाकीस्वार जखमी)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)