Curse of Dowry System: ठरलेला हुंडा दिला नाही म्हणून मुलाने दिला लग्नास नकार; म्हणाला, 'डिमांड पूर्ण झाली नाही तर...' (Watch Video)

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नवरदेव हुंडा दिला नाही म्हणून लग्न मोडण्याची भाषा करत आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशाने कितीही प्रगती केली तरी अजूनही ‘हुंडा प्रथा’ बंद झाली नाही व त्यामुळे अनेक मुलींचे संसार सुरु होण्याआधीच विस्कटले आहेत तर अनेकींची लग्ने मोडली आहे. आताही बिहारमधील एका मुलीचे लग्न हुंड्यामुळे मोडण्याची परिस्थिती उद्भवली आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नवरदेव हुंडा दिला नाही म्हणून लग्न मोडण्याची भाषा करत आहे. मुलीच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे, वधू तयार होऊन मंडपात आली आहे आणि इतक्यात पूर्ण हुंडा दिला नाही म्हणून नवरदेव लग्नास नकार देत आहे. त्याला समजावून सांगत असताना, हुंडा घेणे ही सामान्य गोष्ट असल्याचे तो सांगतो. सोशल मिडियावर या नवरदेवावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement