Amravati Video : भाजी विक्रेत्याने धुतली घाणेरड्या पाण्यात भाजी, अमरावती येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
स्वच्छतेबाबत अनेकजण निष्काळजी असतात. आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक भाजी विक्रेता पाईपमधून येणाऱ्या घाणेरड्या पावसाच्या पाण्याने भाजी धुत आहे. हा व्हिडिओ अमरावती शहरातील आहे. यावेळी तो भाजीपाला धुवून विकण्यासाठी गाडीत ठेवतो.
Amravati Video : अन्नपदार्थांमध्ये घाण असेल तर व्यक्ती आजारी देखील होऊ शकते. स्वच्छतेबाबत अनेकजण निष्काळजी असतात. आता एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक भाजी विक्रेता पाईपमधून येणाऱ्या घाणेरड्या पावसाच्या पाण्याने भाजी धुत आहे. हा व्हिडिओ अमरावती शहरातील आहे. यावेळी तो भाजीपाला धुवून विकण्यासाठी गाडीत ठेवतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही नाराजी व्यक्त करत आहेत. याआधीही मुंबईतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती स्टेशनवर घाण पाण्याने भाजी धुत होते.
पाहा व्हिडीओ:
Amravati | सावधान! ही भाजी तुमच्या पोटात तर जात नाही ना? | NDTV मराठी#amravati #ndtvmarathi pic.twitter.com/zP2WkWu7zU
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)