Gujarat Viral Video: सिंहांचे संपूर्ण कुटुंब अचानक शेतकऱ्याच्या घरी पोहोचले, व गोठ्यात बसून घेतला पावसाचा आनंद; हा हृदयस्पर्शी व्हिडिओ एकदा नक्की पहा

गुजरातमधील गीर सोमनाथ येथे एका शेतकऱ्याच्या घरी सिंहांचे संपूर्ण कुटुंब दिसले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यात सिंहांचे कुटुंब बसून पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे.

Photo Credit: X

गुजरातमधील गीर सोमनाथ येथे एका शेतकऱ्याच्या घरी सिंहांचे संपूर्ण कुटुंब दिसले. त्यांचा  व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या गोठ्यात सिंहांचे कुटुंब बसून पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. वास्तविक, सध्या गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे हवामान खात्यानेही रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील ४ ते ५ दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. वन्य प्राण्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे वन्य प्राणी आश्रयासाठी मानवी वस्तीकडे वळत आहेत.हेही वाचा: Leopard Spotted at Prozone Mall Aurangabad: औरंगाबादमधील प्रोझोन मॉल परिसरात बिबट्याचा वावर (Watch Video)

पहा व्हिडिओ -  

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now