पालघर जिल्ह्यात विराज एस.एम.एस 2 कंपनीत मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी केली तोडफोड

तीन चार दिवसांपासून या कंपनीत मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी संप पुकारला होता. त्या संदर्भात बैठक बोलावली होती. काही मुद्द्यांवर असहमती झाल्यामुळे युनियनच्या कामगारांनी तोडफोड करायला सुरवात केली.

मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी तोडफोड केली (PC - Twitter)

पालघर जिल्ह्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या विराज एस.एम.एस 2 कंपनीत काल बैठकी दरम्यान मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी तोडफोड केली आणि पोलीसांवर देखील हल्ला केला. तीन चार दिवसांपासून या कंपनीत मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी संप पुकारला होता. त्या संदर्भात बैठक बोलावली होती. काही मुद्द्यांवर असहमती झाल्यामुळे युनियनच्या कामगारांनी तोडफोड करायला सुरवात केली. या हल्ल्यात 15 पोलीस जखमी झाले. यावेळी संतप्त कामगारांनी पोलिसांच्या गाड्यांची, आसपासच्या गाड्यांची आणि कंपनीच्या कार्यालयची मोठया प्रमाणात तोडफोड केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement