Weather Update: मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; हवामान खात्याची माहिती

उत्तर किनारपट्टीपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

photo credit -x

Weather Update:  राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा(Unseasonal Rain) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. याशिवाय 12 एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र(Central Maharashtra), विदर्भ(Vidarbha), मराठवाड्यात(Marathwada) अशीच स्थिती राहणार आहे. विदर्भात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलीये. (हेही वाचा :Maharashtra Weather Update: 7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात गारपिटीसह पावसाच्या हजेरीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement