Weather Forecast: विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, जाणून घ्या हवामान अंदाज
राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊसांसदर्भात हवामान विभागाने अपडेट दिला आहे.
Weather Forecast: राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊसांसदर्भात हवामान विभागाने अपडेट दिला आहे. विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पाऊस असणार आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस विदर्भातील नागरिकांना कडक उष्णतेपासून आराम मिळणार आहे. पुढील दोन दिवस अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस असणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तवत विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट दिला आहे. (हेही वाचा- आज पाऊस पडेल का? आयएमडी हवामान अंदाज घ्या जाणून)