Varsha Gaikwad Resigns As MLA: वर्षा गायकवाड यांचा आमदारकीचा राजीनामा; धारावीकरांसाठी शेअर केली भावनिक पोस्ट  

'गायकवाड कुटुंबाला धारावीने नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे आणि त्या प्रेमाचे ऋण आमचे कुटुंब यापुढेही फेडत राहील' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Varsha Gaikwad | X

कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार वर्षा गायकवाड यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये त्यांनी भाजपाच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. मात्र 4 वेळेस धारावीमधून त्या आमदार राहिल्यानंतर आता लोकसभेमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचं नेतृत्त्व करणार आहेत. 'धारावीकरांच्या हक्काच्या या लढ्यात मी आणि माझे कुटुंब नेहमीच सहभागी होतो, आहोत आणि राहणार. आपण सर्वजण एकजुटीने लढू आणि नक्कीच जिंकू.' अशा भावना पोस्ट करत त्यांनी मतदारांचे आणि धारावीकरांचे आभार मानले आहेत.

वर्षा गायकवाड यांची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)