Uddhav Thackeray Speech: 'हिम्मत असेल तर महिन्याभरात मुंबई महापालिकेची व महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा'; उद्धव ठाकरे यांचे अमित शहांना आव्हान

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप, अमित शाह, बंडखोर आमदार यांच्यावर कडाडून टीका केली.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

यंदाच्या शिवसेनेच्या शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. अद्याप पक्षाला शिवतीर्थावर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली नाही. अशात आज शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वाच्या मुद्दांवर भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप, अमित शाह, बंडखोर आमदार यांच्यावर कडाडून टीका केली. राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जाहीर सभेमध्ये बोलले.

‘आज पर्यंत मी पोरे पळवणारी टोळी ऐकली होती. मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये बाप पळवणारी टोळी पाहत आहे. ज्यांना मी सत्तेचे दूध पाजले तेच आज उलट्या करायला लागले आहेत,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now