Road Accident In Udaipur: रस्त्यावरून चालणाऱ्यांना ट्रेलरने चिरडले, अपघातात 4 जणांचा मृत्यू
राजस्थानमधील उदयपूरमध्ये एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. ज्यामध्ये एका ट्रेलरने रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चिरडले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. लोकांना चिरडून ट्रेलर खड्ड्यात पडला.
राजस्थानमधील उदयपूरमध्ये एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. ज्यामध्ये एका ट्रेलरने रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना चिरडले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. लोकांना चिरडून ट्रेलर खड्ड्यात पडला. ट्रकचा तोल गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, ट्रेलर ट्रक आणि डंपरची धडक झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने आधी एका डंपरला मागून धडक दिली आणि ट्रेलर खड्ड्यात पडला, त्यात दुभाजकावरून चालणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुषाला चिरडले. या घटनेत मृत्युमुखी पडलेला चौथा व्यक्ती ट्रेलर चालक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात क्लिनरही गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)