Terror Threat In Mumbai: मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; स्वतःला तालिबान म्हणवणाऱ्या व्यक्तीने NIA ला पाठवला मेल, अलर्ट जारी

सध्या पोलीस आणि इतर एजन्सी तपास करत आहेत आणि ईमेल कोठून पाठवण्यात आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Terror Threat In Mumbai: मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. एनआयएला धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर देशातील विविध शहरांना सतर्क करण्यात आले आहे. एनआयएने मुंबई पोलिसांनाही ही माहिती दिली आहे. पोलीस आणि इतर यंत्रणा तपासात गुंतल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल आला होता, ज्यामध्ये मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलरने स्वत:चे तालिबान असल्याचे वर्णन केले असून तालिबान संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार हे घडत असल्याचा दावा केला आहे. धमकीच्या ईमेलची माहिती मिळताच मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. सध्या पोलीस आणि इतर एजन्सी तपास करत आहेत आणि ईमेल कोठून पाठवण्यात आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर देशातील विविध शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)