Sanskrut Pune : पुण्यात वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर आले एकत्र; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात घेतला मिसळ पावचा आस्वाद (Watch Video)
कोथरूडमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी एकत्र नाश्ता केला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Sanskrut Pune : काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) उमेदवार वसंत मोरे हे पुण्यातील कोथरूडमधील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात एकत्र नाश्ता करताना दिसले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही प्रतिस्पर्धी नेत्यांनी मिसळपावचा आनंद घेतला. मात्र, मुरलीधर मोहोळ यांची गैरहजेरी दिसली. 20 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन्ही प्रतिस्पर्धी नेते एकत्र नाश्ता करताना दिसले. वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला. "अत्याधुनिक पुणे! आज रविभाऊ आणि मी मुरलीअण्णा मोहळ यांच्या प्रभागात कोथरूड येथे नाश्ता केला.",असे कॅप्शन वसंत मोरे यांनी या पोस्टला दिले आहे. (हेही वाचा :Hatkanangale Loksabha: हातकणंगल्यातून आमदार आवाडेंची लोकसभा निवडणुकीतून माघार; धैर्यशील मानेंना दिला जाहीर पाठिंबा )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)