Raj Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त 12 जूनला पुण्यात वसंत मोरे यांच्याकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन  करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जूनला यंदा 54 वा वाढदिवस आहे. वसंत मोरे यांनी पुण्यात  प्रभाग क्र. ५६,५७,५८ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेकडो तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत असे त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

वसंत मोरे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)