Lonavala Bhushi Dam Waterfall Accident: लोणावळा भुशी धरण धबधबा दुर्घटनेमधील सर्व 5 जणांचे मृतदेह सापडले; शोध आणि बचाव कार्य थांबवले
रविवारी घडलेल्या भुशी धरणाजवळील दुर्घटनेत पाच पर्यटक वाहून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान घडली होती.
Lonavala Bhushi Dam Waterfall Accident: लोणावळा येथे रविवारी घडलेल्या भुशी धरणाजवळील दुर्घटनेत पाच पर्यटक वाहून गेले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. तेव्हापासून पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवकांची टीम पर्यटकांना शोधण्यासाठी काम करत होते. त्यातील तिघांचे मृतदेह त्याच दिवशी सापडले व उर्वरित दोघांसाठी शोध मोहीम पुन्हा सुरू ठेवण्यात आली. सोमवारी सकाळी त्यातील एकाचा मृतदेह सापडला, तर संध्यायकळी शेवटचा मृतदेह शोधण्यात यश आले. दोन दिवसाच्या शोध मोहीम नंतर वाहून गेलेल्या पाचही जणांचे मृत्यूदेह सापडले आहेत. ही माहिती पुणे ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली. त्यानंतर शोध आणि बचाव कार्य थांबवण्यात आले. हेही वाचा: Bhushi Dam Overflow: मोठी बातमी! भुशी धरणामागील धबधब्यात पाच मुले वाहून गेले; शोधकार्य सुरु (Watch Video)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)