Shiv Sena: निवडणुक आयोगाकडून केवळ पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं ‘शिवसेना’ पक्षाचं नाव नाही, निलम गोऱ्हेंचा ‘शिवसेना’ पक्ष नावाबाबत मोठा खुलासा

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की, शिवसेना हेच नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल म्हणजेचं शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावे लागेल असे निवडणुक आयोगाकडून सुचवण्यात आले आहे.

Shiv Sena Election Symbol |

काल निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण निवडणुक आयोगाकडून गोठवण्यात आलं अश्या बातम्या प्रसार माध्यमावर फिरत होत्या. पण हे सगळं खोडून काढत शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की, शिवसेना हेच नाव वापरतां येईल परंतु त्याला काही नाव जोडावे लागेल म्हणजेचं शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावे लागेल असे निवडणुक आयोगाकडून सुचवण्यात आले आहे. तरी धनुष्यबाण गोठवण्याचा आयोगाचा निर्णय तात्पुरता आहे.चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू राहील हे आयोगानं म्हटलं आहे. तसेच शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्षनावाबाबत चुकीची माहिती देऊ नये, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)