MVA Protest in Sindhudurg over Shivaji Maharaj Statue Collapse: 'शिवद्रोह्यांना करू गपगार, माफी नाही हद्दपार'; एमव्हीएकडून मुंबईत फलकबाजी
मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी माविआ नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
MVA Protest in Sindhudurg over Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या (Shivaji Maharaj Statue Collapse)दुर्घटनेनंतर महाविकास आघाडीकडून राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी माविआ नेत्यांनी(MVA Protest) सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. फलकबाजी करत सरकारविरोधात हायहायच्या घोषणा दिल्या. शिवद्रोह्यांना करू गपगार, माफी नाही हद्दपार, जाब विचारायला आलो..आमच्या दैवताचा केलेल्या अवमानाचा, दुखावल्या गेलेल्या स्वाभिमानाचा अशा आशयाचे फलक आंदोलकानी झळकावले.
मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)