मुंबई न्यायालयाकडून Sanjay Raut यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीने दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी मुंबई न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीने दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी मुंबई न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. शिवडी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर न झाल्याने संजय राऊत यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. यापूर्वी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले होते की शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रथमदर्शनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या विरोधात बदनामीकारक विधाने केली होती आणि त्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात शिवसेना नेत्याला समन्स बजावला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now