Mumbai Coastal Road Update: मुंबईकरांना दिलासा! उद्यापासून सुरु होणार कोस्टल रोडचा हाजी अली ते खान अब्दुल गफार खान प्रवासाचा टप्पा, जाणून घ्या वेळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे साडे तीन किलोमीटर लांबीच्या या टप्प्याची आज प्रत्यक्ष पाहणी केली.

Mumbai Coastal Road Update: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा टप्पा आणि हाजी अली आंतरबदलातील आर्म 8 (लोटस जेट्टी जंक्शनपासून ते उत्तर वाहिनी मार्गिकेवरील हाजी अली येथील मुख्य पूल) उद्या गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून तात्पुरत्या स्वरुपात खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे साडे तीन किलोमीटर लांबीच्या या टप्प्याची आज प्रत्यक्ष पाहणी केली.

हा टप्पा आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहील. तर प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बंद राहील. (हेही वाचा: Ticket Checking Drives: पश्चिम रेल्वेच्या पथकाकडून तिकीट तपासणी मोहीम; एप्रिल ते जून दरम्यान वसूल केला तब्बल 52 कोटी रुपयांहून अधिक दंड)

पहा पोस्ट- 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)