Mumbai: मुंबईमधील सर्व रेस्टॉरंट्स रात्री 12 तर इतर दुकाने रात्री 11 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी- BMC
कोविडसाठी लागू असलेली मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून, आता रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांनुसार मुंबईमधील सर्व भोजनालये व उपहारगृह रात्री 12 तर इतर आस्थापने रात्री 11 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोविडसाठी लागू असलेली मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे परिस्थिती नुसार लागू राहील. सध्या सणासुदीचे दिवस आहेत दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'ब्रेक-द-चेन' अंतर्गत महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमांनुसार सर्व भोजनालये व उपहारगृह रात्री १२ तर इतर आस्थापने रात्री ११ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.#BreakTheChain#NaToCorona pic.twitter.com/nyj0FOadnR
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 19, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2021 10:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

