Mumbai Airport System Down: मुंबई विमानतळावर सर्व्हर डाऊन; टर्मिनल 2 वर प्रवाशांची गर्दी, ट्विटरवर शेअर केल्या तक्रारी

तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील असून लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mumbai Airport System Down

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन. त्यामुळे गेल्या 20 मिनिटांपासून चेक इन करताना प्रवाशांना त्रास होत आहे. नियोजित उड्डाणे बुक झाल्यावर विमानतळावर चेक-इनसाठी प्रवाशांची गर्दी होते. अशावेळी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील असून लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement