आमदार Santosh Bangar 'शिवसेना सोडून नका म्हणत ढसाढसा रडले, बहुमत चाचणीवेळी हळूच शिंदे गटात शिरले'
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करणारे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आमदार संतोष बांगर हेही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे.
विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. त्यानंतर चोवीस तासातच शिंदे सरकारने शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात मतदान करणारे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार आमदार संतोष बांगर हेही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेना आमदारांचा आकडा आता 40 वर गेला आहे. बांगर हे सुरूवातीपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्यामुळं त्यांचं त्यांच्या मतदारसंघातही जंगी स्वागत करण्यात आलं होतं.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)