Mega Block Update April 28: मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळा!

28 एप्रिलच्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई मध्ये रविवारी लोकल सेवेच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. 28 एप्रिलच्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास करणार्‍यांनी हे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे. मध्य रेल्वे वर ठाणे- कल्याण अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक आहे तर सकाळी 10.43 ते दुपारी 3.44 पर्यंत मुलुंडहून सुटणाऱ्या डाऊन स्लो/सेमी फास्ट सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकावर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

सकाळी 10.36 ते दुपारी 3.51 वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप स्लो/सेमी फास्ट सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येईल, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे स्थानकावर थांबतील आणि पुढे अप स्लो मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकावर नियोजित वेळेच्या 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्ग सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्ग सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलहून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)