Lok Sabha Result 2024: सांगलीत मतमोजणीदरम्यान गोंधळ; विशाल पाटलांच्या कार्यालयाबाहेर पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
लोकसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. काही ठिकाणचे निकाल देखील हाती येण्यास सुरूवात झाली आहे.
Lok Sabha Election 2024: देशात 18 वी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024)साठी मतमोजणी पार पडत आहेत. काही ठिकाणी उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. मात्र सांगलीत (Sangli) मतमोजणीदरम्यान गोंधळाची परिस्थीती निर्माण झाली. विशाल पाटलांच्या (Vishal Patil ) कार्यालयाबाहेर पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सांगलीत विशाल पाटलांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोषसुरू होता. परिस्थीती चिघळून नये यासाठी पोलिसांनी विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
Lok Sabha Result 2024 Live : विशाल पाटलांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ; पोलीस आणि कार्यकर्त्यांची बाचाबाची https://t.co/FzUOpuMfw0#माझाखासदार #ResultsOnABP #ResultsOnABPMajha #loksabhaelecetion2024 #ElectionsResults pic.twitter.com/VKVxTB0kxT
— ABP माझा (@abpmajhatv) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 12:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

