Leopard Found in Lohgaon: लोहगाव येथील आरआयटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर; वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि वनविभाग दाखल झाले आहे. महाविद्यालयाच्या आवारात 2 बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leopard Found in Lohgaon: पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे असलेल्या आरआयटी पॉलिटेक्नीक कॉलेजच्या (RIT Polytechnic College)आवारात बिबट्याचा वावर आढळला आहे. वडगाव शिंदे रस्त्यावर आरआयटी कॉलेज आहे. कॉलेजच्या परिसरात बिबट्या वावरताना (Leopard Spotted in Lohgaon)दिसला. त्यामुळे कॉलेज बंद करण्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतला. बिबट्या अचानक दिसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि वनविभाग दाखल झाले आहे. महाविद्यालयाच्या आवारात २ बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कॉलेज पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. कॉलेजमधील एका कॅन्टीनमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्याने बिबट्याला पाहिलं. त्यानंर ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. (हेही वाचा:Leopard Spotted in Katraj Ghat: दिवेघाट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर आता कात्रज घाटात दिसला बिबट्या (Watch Video))

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif