Leopard Sighting: पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचे दर्शन; घटना समोर येताच वन अधिकाऱ्यांकडून शोध सुरू (Video)
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बिबट्या दिसल्याची घटना घडली आहे. घटना समोर येताच पुणे वन विभागाने शोध मोहीम सुरू केली. रात्री 8 वाजता धावपट्टीजवळ हे दृश्य दिसल्याने विमानतळाच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे.
Leopard Sighting: 28 एप्रिलच्या रात्री पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात एक बिबट्या (Leopard) दिसल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पुणे वन विभागाने शोध मोहीम सुरू केली आहे. रात्री 8 वाजता धावपट्टीजवळ हे दृश्य दिसल्याने विमानतळाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वन अधिकाऱ्यांनी कॅमेरा ट्रॅप बसवले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरे बसवण्यात येत आहेत. यापूर्वी रविवारी विमानतळाजवळ पुन्हा एकदा बिबट्या दिसला होता. त्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की बिबट्या जवळच्या जंगलातून आला असावा.
पुणे विमानतळावर बिबट्या दिसला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)