Landslide On Railway Track: रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली, अनेक गाड्या थांबल्या, प्रवासी चिंतेत (Watch Video)

मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात संततधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पावसामुळे कोकण रेल्वेवरही परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील दिवाणखोटी रेल्वे स्थानकाजवळील कशेडी बोगद्याजवळ रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने डेब्रिज रेल्वे रुळावर पडला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील कशेडी बोगद्यासमोरील रेल्वे रुळावरील मलबा हटवण्याचे काम सुरू झाले आहे. कोकण रेल्वेची वाहतूक येत्या काही तासांत सुरळीत होईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत असून, अनेक गाड्या गेल्या दोन तासांपासून विविध स्थानकांवर थांबल्या आहेत. प्रवासीही गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)