Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात ४, हजार ७०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Khadakwasala Dam (PC - Twitter)

पुणे शहर आणि खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सलग होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. परिस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात ४,७०८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पावसाचा जोर आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ लक्षात घेऊन विसर्गाचे प्रमाण आवश्यकतेनुसार कमी-जास्त केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून जलसंपदा विभागाने परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement