Raj Thackeray On PFI: पुढेही अशी कीड जेव्हा तयार होईल तेव्हा ती तात्काळ नष्ट करायला हवी, राज ठाकरेंचे ट्विट चर्चेत

केंद्रिय तपास यंत्रणांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील विविध ठिकाणी आठवडाभर छापे टाकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: YouTube)

केंद्रिय तपास यंत्रणांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील विविध ठिकाणी आठवडाभर छापे टाकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. पीएफआयला बेकायदेशीर संघटना घोषित केल्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान आता राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. यापुढेही अशी कीड जेव्हा तयार होईल तेव्हा ती तात्काळ नष्ट करायला हवी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now