Bhusawal; मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर साचले पाणी; सुरक्षेच्या कारणास्तव अनेक गाड्यांची वाहतूक थांबवली, जाणून घ्या यादी

आज संध्याकाळी मूर्तिजापूर-माना विभागादरम्यान रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी साचले. हे पाणी काढून रूळ पुन्हा वाहतुकीयोग्य बनवण्याचे काम सुरु आहे.

रेल्वे रुळांवर साचले पाणी

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाचा परिणाम वाहतुकीवरदेखील होत आहे. आज संध्याकाळी मूर्तिजापूर-माना विभागादरम्यान रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी साचले. हे पाणी काढून रूळ पुन्हा वाहतुकीयोग्य बनवण्याचे काम सुरु आहे. अशात सुरक्षेच्या कारणास्तव येणाऱ्या आणि जाणाऱ्या अनेक गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 11121, 12833, 22827, 12106, 12136, 12102, 22940 या गाड्या रोखल्या आहेत. (हेही वाचा; Pune Water Cut News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: शहरातील काही भागांत पाणी पुरवठा येत्या गुरुवारी बंद)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement