Unseasonal Rain: नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गारपीटीसह मुसळधार पाऊस; पिकांचं मोठं नुकसान, Watch Video

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

Heavy Rain in Dhule (PC - Twitter)

Unseasonal Rain: गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळला आहे. अशातचं आता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यामधल्या माळमाथा परिसरातल्या आमखेल, कुत्तरमाने, छडवेल कोरडे, बासर, सिदबन, पचाळे, कालटेक, धनाई पुणाई, झिरणीपाडा या गावांच्या परिसरात आज दुपारी गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं. तसेच विशेषतः नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या आष्टे, ठाणेपाडा , सिंदबन आणि छडवेल कोर्डे इत्यादी गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement