Ahmednagar Fire: अहमदनगर येथील साखर कारखान्याला भीषण आग, अनेक लोक अडकल्याची शक्यता
मिलमध्ये अनेक लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या किमान 10 गाड्या घटनास्थळी हजर आहेत.
महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये गंगामाई साखर कारखान्यात डिस्टिलरी युनिटमध्ये स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली आहे. मिलमध्ये अनेक लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या किमान 10 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. ट्विटरवर पोस्ट केलेल्या फुटेजमध्ये धुराचे दाट लोट उठताना दिसत आहे, तर आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वाला उसळत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)