Hambirrao Amritrao Baji Mohite Dies: हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचे निधन
कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचे पुण्यात 98 व्या वर्षी निधन झाले आहे.
हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचे 30 जून दिवशी पुण्यात निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तिसरे सुपुत्र रतोजी राजे, यांचे थेट वंशज होते. त्यांच्या 7 पिढ्या भारतीय लष्करी सेवेत योगदान देत आहेत. कॅप्टन हंबीरराव स्वतः मराठा लाईट इन्फंट्री तर्फे 20 व्या वर्षी दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनी इटली येथील युद्धात हिटलरच्या नाझी सैन्याविरुद्ध ‘प्लॅटून टॅंक कमांडर’ म्हणून मोठी कामगिरी बजावली होती.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)