Ratnagiri Fire News : रत्नागिरी एमआयडीसीत अग्नितांडव! आगीची तिसरी घटना, प्रचंड लोळ (Video)
रत्नागिरीच्या खेड लोटे एमआयडीसी परिसरात एका खाजगी कंपनीत भीषण आगीची घटना घडली. सोशल मिडीयावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तीव्र आगीच्या ज्वाळा लागल्याचे दिसून आल्या आहेत.
Ratnagiri Fire News : आजचा रविवारचा दिवस हा घातवार ठरला आहे. कारण आज विविध ठिकाणी आगीच्या (Fire News) मोठ्या घटना घडल्या आहेत. सोलापूरसह रत्नागिरी आणि हैदराबादमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. हैदराबादमध्ये घडलेल्या आगीच्या घटनेत तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापुरातील एमआयडीसी भागातील टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. आग लागून जवळपास 10 तास उलटले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, आणखी 4 जणांचा शोध सुरु आहे. सोशल मिडीयावरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दाट काळा धूर आकाशात उडत असताना इमारतीला तीव्र आगीच्या ज्वाळा लागल्याचे दिसून आले आहे. जळत्या इमारतीतून (Ratnagiri MIDC) लोक पळून जाताना दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे समोर आलेले नाही.