Fire broke out in Mumbai: मुंबईतील कुर्ला परिसरात निवासी इमारतीला आग, 39 जण रुग्णालयात दाखल
मुंबईतील कुर्ला परिसरातील 12 मजली निवासी इमारतीला शुक्रवारी रात्री उशीरा आग लागली. ही आग विजेचा तारा आणि इमारतीतील इतर सदनिकांमध्ये पोहोचली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि वेगवेगळ्या मजल्यांवरील सुमारे 50-60 लोकांना बाहेर काढले.
मुंबईतील कुर्ला परिसरातील 12 मजली निवासी इमारतीला शुक्रवारी रात्री उशीरा आग लागली. ही आग विजेचा तारा आणि इमारतीतील इतर सदनिकांमध्ये पोहोचली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि वेगवेगळ्या मजल्यांवरील सुमारे 50-60 लोकांना बाहेर काढले. त्यापैकी 39 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)