Shrikant Sarmalkar Dies: शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन
सरमळकर हे1985 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून तर 1990 मध्ये ते वांद्रे पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते.
शिवसैनिक आणि खेरवाडीचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजारपणानंतर त्यांचे आज निधन झाल्याची माहिती मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करत दिली आहे. श्रीकांत सरमळकर हे नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले होते मात्र 2011 मध्ये ते शिवसेनेत परतले होते. उद्या सकाळी वांद्रे मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सरमळकर हे1985 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून तर 1990 मध्ये ते वांद्रे पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)