Maharashtra Bomb Threat: सतर्क रहा! राज्यात बॉम्ब ब्लास्टची धमकी; महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला धमकीचा ईमेल

भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान मुंबई हाय अलर्टवर आहे. त्यातच आता महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल मिळाला आहे. ईमेलमध्ये बॉम्ब ब्लास्टची धमकी देण्यात आली आहे.

Photo Credit- X

Maharashtra Bomb Threat: भारत-पाकिस्तान तणाव परिस्थीतीदरम्यान देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर असते. आता राज्यात बॉम्ब ब्लास्ट ( Bomb Blast ) होणार असल्याचा धमकीचा एक मेल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला (Maharashtra Police Control Room ) मिळाला आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. या मेलमध्ये 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच राज्यातील कुठल्याही भागाला दुर्लक्ष करू नका, असंही या मेलमध्ये म्हंटलं आहे. हा मेल कोणी केला याचा तपास सध्या सुरू आहे. सोमवार ते बुधवारदरम्यान सर्वांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात बॉम्ब ब्लास्टची धमकी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement