Pune News: रविवार पेठेतील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या गायीची क्रेनच्या मदतीने सुटका (Video)
पुण्यातील रविवार पेठेत एक विचित्र घटना घडली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या गायीला खाली उतरता येत नसल्याने अखेर अग्निशमन दलाला क्रेनचा वापर करून तिची सुटका करावी लागली.
Pune News: पुण्यातील रविवार पेठेतील (Raviwar Peth) एका विचित्र घटनेत, एक गाय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढत गेली. मात्र, गायीला खाली उतरता येत नसल्याने. इमारतीतील नागरिकांनी बचाव मोहिम राबवत अग्निशमन दलाला पाचारण केले. अखेर त्या गायीची क्रेनच्या मदतीने (Cow Rescue by Crane) सुटका करण्यात आली. क्रेनचा वापर करून गायीला सुरक्षितपणे जमिनीवर आणण्यात आले. ही संपूर्ण नाट्यमय आणि दुर्मिळ घटना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)