Mumbai: कोस्टल रोड 10 जूनपर्यंत खुला होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
कोस्टल रोड (Coastal Road) चा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत खुला केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी सांगितलं. आज शिंदे यांनी मरीन ड्राइव्हच्या टोकाला असलेल्या दक्षिणेकडील बोगद्यातील गळतीचीही पाहणी केली, जो पहिल्या टप्प्याचा एक भाग आहे.
Mumbai: वरळी ते मरीन ड्राइव्ह (Marine Drive) दरम्यानच्या कोस्टल रोड (Coastal Road) चा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत खुला केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी सांगितलं. आज शिंदे यांनी मरीन ड्राइव्हच्या टोकाला असलेल्या दक्षिणेकडील बोगद्यातील गळतीचीही पाहणी केली, जो पहिल्या टप्प्याचा एक भाग आहे. मार्चमध्ये कोस्टल रोडचे उद्घाटन झाले. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोस्टल रोडच्या दोन ते तीन विस्तारीकरण जॉइंट्समध्ये गळती होती आणि ती पॉलिमर ग्राउटिंग वापरून प्लग केली जातील. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पावसाळ्यातही पाणी साचू नये म्हणून बोगद्याच्या प्रत्येक बाजूला सर्व 25 जॉइंट्सवर पॉलिमर ग्राउटिंग करण्याची सूचना केली आहे.
दुरुस्तीच्या कामामुळे कोस्टल रोडवरील वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही आणि वाहनधारकांची गैरसोय होणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.. मरीन ड्राईव्ह ते वरळी हा कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)