Yavatmal: पुराच्या पाण्यातून खांद्यावर तिरडी घेऊन मृतदेहावर स्मशान भूमित अंत्यसंस्कार, Watch Video

ही घटना महागाव तालुक्यातील माळ किन्ही या गावातील आहे.

पुराच्या पाण्यातून वाट काढत मृतावर अंत्यसंस्कार (PC - Twitter)

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्याच्या माळकिन्ही गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह घेऊन नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागली. नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून प्रेतावर अंत्यसंस्कार केले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नातेवाईकांनी मृतदेह तिरडीवर बांधून खांद्यावर घेऊन एकमेकांच्या साह्याने नाल्याच्या पुरातून वाट काढत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना महागाव तालुक्यातील माळ किन्ही या गावातील आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)