Maharashtra Rain Update: येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, यंत्रणा सतर्क

येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. राज्यासोबत देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. राज्यासोबत देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नारिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement