हवामान केंद्र मुंबईने गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने 11 सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी केला आहे. राज्यात येत्या 4 ते 5 दिवसांत पावसाची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
पुढील ४-५ दिवस पश्चिम कोकण, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता संबंधित जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवावी. आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिल्या आहेत. pic.twitter.com/RBY8CqMvuq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)