मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना खपवून घेणार नाही, आदित्य ठाकरे यांचा इशारा
मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
कर्नाटक विधिमंडळामध्ये काँग्रेसचे आमदार Laxman Savadi यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना ' मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. असं म्हटलं आहे. तसेच मुंबई आम्हाला कोणी आंदण दि लेली नाही. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी.'असं X पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह - आदित्य ठाकरे
मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे.
काँग्रेस असो वा भाजप... कोणताही पक्ष असो... मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही.
मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे.…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2024 02:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

