High Court On Narayan Rane Bungalow: केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या घरावर फिरणार बुलडोजर, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने पुढील दोन आठवड्यात नारायण राणे यांच्या जूहू परिसरातील अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत.

Narayan Rane (Pic Credit - ANI)

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जूहू (Juhu) तारा रोडवरील बेकायदेशीर बांधकाम (Unauthorised Construction) केल्याचा आरोप होता. हे बेकायदेशीर बांधकाम राणे यांनी स्वत:हून हटवावे, अन्यथा पालिकेला तोडक कारवाई करून हटवावे लागेल, असा इशारा मुंबई महापालिकेने राणे यांना नोटीसीद्वारे दिला होता. तरी आता मुंबई उच्च न्यायालयाने (Bombya High Court) पुढील दोन आठवड्यात हे अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत.  तसेच अनाधिकृत बांधकाम केल्याबाबत नारायण राणेंना 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now