Chhatrapati Sambhaji Nagar: औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
आता औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखले जाईल.
महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या बदललेल्या नावांना केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. आता औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखले जाईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्याबद्दल भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि ढोल वाजवले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)