औरंगाबाद शहराचे नाव झाले ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे 'धाराशिव'; केंद्र सरकारने दिली मंजुरी

दोन्ही शहरांची नावे बदलण्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

औरंगाबाद शहराचे नाव झाले ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे 'धाराशिव'; केंद्र सरकारने दिली मंजुरी
CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास मान्यता दिली असून, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते. आता माहिती मिळत आहे, या दोन्ही शहरांची नावे बदलण्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

फडणवीस म्हणतात, 'औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ झाले. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने करुन दाखविले.'

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2023 07:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).