Asia's 50 Best Restaurants 2024: आशियातील सर्वोत्तम रेस्टॉरंटची यादी जाहीर, मुंबईच्या या रेस्टॉरंटचाही समावेश; पहा संपूर्ण यादी

मास्कला सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वोत्तम रेस्टॉरंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. आदिती दुगर आणि शेफ वरुण तोतलानी या रेस्टॉरंटचे मालक आहेत.

2024 साठी आशियातील 50 सर्वोत्तम रेस्टॉरंटची यादी आज म्हणजेच 26 मार्च रोजी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे एका समारंभात प्रसिद्ध करण्यात आली. टोकियोचे साझेन, टोकियोचे फ्लोरिलेज आणि बँकॉकचे गग्गन आनंद हे या यादीतील टॉप रेस्टॉरंट आहेत. भारतातील तीन रेस्टॉरंटचाही या यादीत समावेश आहे. मुंबईच्या मास्क रेस्टॉरंटला 23 वे स्थान मिळाले. नवी दिल्लीचे इंडियन एक्सेंट रेस्टॉरंट 26 व्या तर चेन्नईचे अवतारना रेस्टॉरंट 44 व्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारे, मास्कला सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वोत्तम रेस्टॉरंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. आदिती दुगर आणि शेफ वरुण तोतलानी या रेस्टॉरंटचे मालक आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement