Weather Update: अमरावती मध्ये सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; यवतमाळ मध्ये किमान तापमानाचा पारा 20 अंशावर

राज्यात काही ठिकाणी तापमानाने ४१ अंशाचा पारा गाठला आहे. तर काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशावर असल्याचं पहायला मिळत आहे.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Weather Update: राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. त्यातच अमरावती (Amravati Temperature)येथे सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर, यवतमाळ(Yavatmal Temperature) येथे 20.0 अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सोमवारी अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD Preditcion) वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. (हेही वाचा:Weather Update: राज्यासह मध्यप्रदेश, ओडिशा, कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचा इशारा; छत्तीसगडमध्ये गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now